रविवार, १८ मे, २०२५

द्रोणागिरी हायस्कूल करंजाचा यशराज थळी ९१% गुणांसह शाळेत अव्वल

 


उरण, दि. १८ :  दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला, ज्यात द्रोणागिरी हायस्कूल उरण, करंजा शाळेचा विद्यार्थी कु. यशराज देविदास थळी याने ९१% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा म्हात्रे आणि द्रोणागिरी हायस्कूल करंजा इंग्रजी माध्यम संस्थेचे चेअरमन प्रदीप नाखवा तसेच शालेय शिक्षण समिती सदस्यांनी यशराजला त्याच्या या उत्कृष्ट यशाबद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

या निकालात उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन आणि प्राचार्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------

#Uran #DronagiriHighSchool #SSCHighlights #SchoolTopper #AcademicExcellence #MaharashtraEducation #LocalNews #SuccessStory

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा