मुंबई: मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टोळीतील दोघा सदस्यांना अटक केली आहे. पोलिसांनी ३२ लाख ४० हजार रुपये किंमतीचे ८१ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.
खेरवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला माहिती मिळाली की जुनैद नईम खान (वय २६) नावाचा एक व्यक्ती एम. आय. जी. क्लब मैदान, बांद्रा पूर्व येथे कोकेन विक्रीसाठी येणार आहे.
पोलिसांनी जुनैदची चौकशी केली असता, त्याने हे कोकेन ओलनरेवाजू जोवीता इमूओबू (वय ४९, नायजेरियन नागरिक) यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले.
पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
---------------------------------------------------------------
#MumbaiCrime #DrugBust #CocaineSeized #MumbaiPolice #Arrest
Reviewed by ANN news network
on
५/१७/२०२५ ०४:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: