पिंपरी: त्रिरत्न बौद्ध महासंघ, पिंपरी केंद्राच्या वतीने नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या धम्मानुस्मृती विहाराचे उद्घाटन मंगलमय वातावरणात पार पडले. या धम्मविहाराच्या नूतनीकरणासाठी लागणारा संपूर्ण निधी आमदार अमित गोरखे यांच्याकडून मंजूर करण्यात आला होता.
या धम्मविहाराची कल्पना १९९२ मध्ये मांडण्यात आली होती. तब्बल ३३ वर्षांनंतर, हे धम्मविहार नव्या रूपात आणि आधुनिक सुविधांसह पुन्हा एकदा समाजासाठी खुले करण्यात आले आहे.
आमदार अमित गोरखे यांनी आपल्या भाषणात धम्मप्रिय बांधवांचा मोठा सहभाग आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून, हा उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगितले.
"हे केवळ एक विकासकार्य नसून, धम्मासाठी माझे सामाजिक कर्तव्य आहे," असेही ते म्हणाले.
या धम्मविहाराच्या माध्यमातून भावी पिढीला बौद्धिक प्रबोधन, नैतिक शिक्षण आणि समतेचे विचार देण्याचे कार्य सतत सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
----------------------------------------------------------------------------------------------------
#Maharashtra #Pimpri #DhammaVihara #Inauguration #SocialWork #Buddhism
Reviewed by ANN news network
on
५/२७/२०२५ ०७:११:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: