दगड मारून तरुणाला केले जखमी, चंदननगर पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
पुणे: चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इनऑर्बिट मॉलच्या गेट क्रमांक ३ जवळ तरुणांच्या दोन गटात झालेल्या भांडणाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक अजय आसवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मुंढवा येथे राहणारा २१ वर्षीय तरुण आपल्या मित्रासोबत सोमनाथनगर, वडगाव शेरी येथील एका स्टॉलवर गप्पा मारत उभा होता. त्याचवेळी मुख्य आरोपी गगन तानाजी शिंदे (वय २२, रा. दयासागर सोसायटी वडगाव शेरी), अभिजीत जगन्नाथ संपत्ते (वय २०, रा. संजय गांधी सोसायटी वडगाव शेरी) आणि आकाश आनंद बेत्ती (वय २२, रा. बीडी कामगार वसाहत चंदननगर) यांनी मिळून फिर्यादीवर हल्ला केला.
आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वी काही वाद होता. याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून या तिन्ही आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, तर त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तीनही आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय आसवले करत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------
#Pune #Assault #GangFight #ChandannagarPolice #Arrested #CrimeNews #PuneCrime #InorbitMall #MaharashtraPolice #YouthViolence

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: