ठाणे: ठाणे पोलिसांनी मोबाईल फोन डेटा (CDR/SDR/Location) चोरी करून तो एका सराईत गुन्हेगाराला विकल्याच्या आरोपाखाली दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एका खाजगी व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई आकाश सोपान सुर्वे आणि हर्षद लक्ष्मण परब यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस कर्मचारी त्यांच्या पदाचा गैरवापर करून मोबाईल फोन क्रमांकांचा डेटा चोरत होते आणि तो डेटा मोहम्मद सोहेल राजपुत नावाच्या गुन्हेगाराला विकत होते. या कृत्याचा ठाणे पोलिसांनी गांभीर्याने तपास केला.
तपासाअंती, पोलीस शिपाई आकाश सोपान सुर्वे आणि हर्षद लक्ष्मण परब यांना ३ मे २०२५ रोजी सेवेतून बडतर्फ करण्यात आले. या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन, ठाणे येथे ५ मे २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.नं. ३/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०३ (२), ३१४, ३१६ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ४६, ६६, ७२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा घटक-१ ठाणे पुढील तपास करत आहे.
-------------------------------------------
#Thane #Crime #Arrest #DataTheft #Police
Reviewed by ANN news network
on
५/१८/२०२५ ०३:१९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: