गुंतवणूक करताना नागरिकांनी अधिक दक्षता घ्यावी, पोलिसांचे आवाहन
पुणे: पिंपळे सौदागर परिसरात एका व्यक्तीला ऑनलाईन गुंतवणूक योजनेत ३.३० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. आरोपींनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क साधून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना व्हॉट्सॲप क्रमांकावरून श्रद्धा चोप्रा आणि सुरेंद्रकुमार दुबे या नावांनी संपर्क साधण्यात आला. त्यांनी स्वतःला स्टॉक मार्केटचे तज्ज्ञ असल्याचे भासवले आणि
आरोपींनी फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ३,३०,०००/- रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे भरल्यानंतर आरोपींनी संपर्क तोडला आणि त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारित) कायदा २००८ चे कलम ६६ (सी), ६६ (डी) आणि भा.द.वि. कलम ४१९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
---------------------------------------------------
#PuneCrime #CyberFraud #OnlineScam #InvestmentScam #Maharashtra #CyberCrime #फसवणूक
Reviewed by ANN news network
on
५/१९/२०२५ ०३:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: