पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन दि. २३ मे २०२५ रोजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. त्यांनी फीत कापून आणि कोनशिला अनावरण करून या नव्याने बांधलेल्या इमारतीचे लोकार्पण केले.
आंबेगाव पोलीस स्टेशनची स्थापना ११ ऑक्टोबर २०२४ रोजी झाली होती. सुरुवातीच्या काळात फक्त दोन खोल्यांमध्ये पोलीस कामकाज सुरू करण्यात आले होते. मात्र, नागरिकांची वाढती लोकसंख्या, गुन्हेगारीचे स्वरूप आणि कार्यक्षेत्र लक्षात घेता स्वतंत्र आणि सुसज्ज इमारतीची गरज निर्माण झाली होती. ही गरज ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आणि निर्धारित वेळेत ते पूर्ण करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्यास सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, तसेच आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रियांका गोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वंजारी, स्वाती देवधर, भोजलिंग दोडमीसे, मोहन कळमकर, रतिकांत कोळी, युवराज शिंदे, मारुती वाघमारे, नितीराज थोरात, सुरेश शिंदे, आदी पोलीस अधिकारी, कर्मचारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.
या नव्या पोलीस स्टेशनमध्ये अधिक कार्यक्षमतेने पोलिसी सेवा दिली जाईल, असे प्रतिपादन या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. त्यांनी नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा व कायदा-सुव्यवस्थेच्या जपणुकीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी केले.
उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पोलीस स्टेशनची नव्याने बांधलेली इमारत आणि सुविधांचा आढावा घेतला.
----------------------------------------------------------------------------------------
#PunePolice #PoliceStation #Inauguration #Maharashtra #LawAndOrder #Development
Reviewed by ANN news network
on
५/२४/२०२५ ०६:५९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: