कळवा, ठाणे: दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज मोठी कारवाई करत ठाण्यातील कळवा भागातून एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीवर पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना संवेदनशील माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप आहे. अटक करण्यात आलेला आरोपी गेल्या पाच वर्षांपासून मुंबई नौदलाच्या गोदीत कार्यरत होता.
एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तीने नौदलाच्या जहाजांसंबंधी गोपनीय माहिती आणि नकाशा पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना पुरवले. हा कर्मचारी 'हनी ट्रॅप'मध्ये अडकल्यामुळे त्याने ही माहिती शत्रू राष्ट्राला दिली, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मुंबई एटीएस आणि ठाणे एटीएसच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही लोक सहभागी आहेत का, याचा तपास एटीएस करत आहे. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, नौदलाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
=================================================
#ATSAction #Thane #MumbaiNavy #Espionage #HoneyTrap #PakistanIntelligence #MaharashtraPolice #Terrorism
Reviewed by ANN news network
on
५/३१/२०२५ ०४:१५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: