मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोनाचा शिरकाव; आरोग्य विभाग अलर्ट
पुणे, दि. २० मे २०२५: पुण्यामध्ये ८७ वर्षीय एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट उभे राहिले आहे, असे चित्र दिसत असले तरी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे तयार आहे, त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, प्रत्येक नागरिकाने आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत राज्यात एकूण ८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक ५६ रुग्ण मुंबईमध्ये आहेत, तर आता पुण्यात एका नवीन रुग्णाची भर पडली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावेळचा कोरोना विषाणू (एलपी ८.१) मागील कोविड-१९ पेक्षा वेगळा आहे. दोन्हीच्या लक्षणांमध्ये काही प्रमाणात साम्य असले तरी, या नवीन विषाणूमुळे होणारा मृत्यूदर खूपच कमी आहे. हा विषाणू परदेशातून भारतात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
परंतु, जर आकडेवारीचा विचार केला, तर परिस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सध्या पुणे आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. डॉक्टरांनी विशेषतः ज्या व्यक्तींना श्वसनाचे त्रास आहेत, त्यांनी अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई आणि पुणे येथील आरोग्य विभागाची यंत्रणा या पार्श्वभूमीवर सक्रिय झाली आहे. हा विषाणू, करोनाचा नवीन प्रकार आहे. या विषाणूचा फैलाव सध्या काही प्रमाणात मंदावलेला असला तरी, पावसाळा आणि थंडीचे प्रमाण वाढल्यास महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात याचा प्रसार वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. आरोग्य यंत्रणा यावर लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक उपाययोजना करत आहे.
-------------------------------------------------------------------------
#CoronaVirus #Pune #Maharashtra #HealthAlert #COVID19 #LP81Variant #IndiaFightsCorona #PublicHealth

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: