वाघोलीत लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणारा सराईत गुन्हेगार अटकेत

 


पुणे: वाघोली परिसरातून लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सुरेश राममुर्ती बोयर (वय २५, रा. उदईराज पलयम थोट्टातल्लम, ता. आंबूर, वेल्लूर, राज्य तमिळनाडू) याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १०/०५/२०२५ रोजी वाघोली येथील बिमला निवास, रॉयल पार्क येथून २ लॅपटॉप आणि ३ मोबाईल चोरी झाले होते. या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. १८५/२०२५, भा. द. वि. कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, ०३/०५/२०२५ रोजी वाघोलीतील आराध्या सोसायटीतून १ मोबाईल चोरीला गेला होता. या प्रकरणी गु. र. नं. १८७/२०२५, भा. द. वि. कलम ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलीस अंमलदार दिपक कोकरे आणि पांडुरंग माने यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषण केले. या तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुरेश बोयर याला अटक केली आणि त्याच्याकडून २ लाख २४ हजार रुपये किंमतीचे ३ लॅपटॉप आणि ७ मोबाईल जप्त केले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, श्री. हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे, श्री. युवराज हांडे, तपास पथक अधिकारी पोउपनि/मनोज बागल, पोलीस अंमलदार प्रदिप मोटे, बाबासाहेब मोराळे, समीर माटे, दिपक कोकरे, विशाल गायकवाड, महादेव कुंभार, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, समीर भोरडे, मंगेश जाधव, राजाराम अस्वले, शिवाजी सालके, शिवाजी चव्हाण यांच्या पथकाने केली. 

--------------------------------------------------

#Pune #Wagholi #Theft #Crime #PunePolice #Arrest #Maharashtra


वाघोलीत लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणारा सराईत गुन्हेगार अटकेत वाघोलीत लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणारा सराईत गुन्हेगार अटकेत Reviewed by ANN news network on ५/१६/२०२५ ०५:२९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".