पुणे: विमानतळ पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात, न्यायालयाने आरोपी दिपक देविदास पपाले याला एक वर्ष तीन महिने सश्रम कारावास आणि ५०००/- रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दिनांक १४/०५/२०२५ रोजी विमानतळ पोलीस गुन्हा रजि. नंबर ९५/२०२४, भारतीय दंड विधान कलम ३८० अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली, ज्यात आरोपी दिपक पपाले याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला.
या गुन्ह्याचा तपास अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४ पुणे शहर, श्री. हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय संकेश्वरी, पोलीस निरीक्षक, गुन्हे श्रीमती आशालता खापरे आणि गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस अंमलदार रुपेश पिसाळ यांच्या पथकाने केला.
-------------------------------------
#Pune #PunePolice #CourtVerdict #CrimeNews #Jail #Theft #Maharashtra
Reviewed by ANN news network
on
५/१६/२०२५ ०५:२१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: