राज्यात आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नवल किशोर राम पुणे महानगरपालिकेचे नवे आयुक्त
पुणे: राज्य सरकारने आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये नवल किशोर राम यांची पुणे महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निवृत्तीनंतर पुणे शहराला नवे आयुक्त मिळाले आहेत. नवल किशोर राम यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. ते 2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, मूळचे बिहारमधील पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील मोतीहारी गावचे आहेत.
राम यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात नांदेड येथे झाली. त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत दोन वर्षे काम केले. बीड आणि औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. 2020 मध्ये ते पुण्याचे जिल्हाधिकारी असताना, त्यांनी कोरोना संकटाच्या काळात गावोगावी भेटी देऊन उल्लेखनीय काम केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत, त्यांना देशभरातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून गौरवण्यात आले. त्यानंतर त्यांची थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाली होती.
----------------------------------------------------------------------------
#Pune #PMC #IAS #Transfer #NavalKishoreRam #Maharashtra #Administration

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: