पिंपरी चिंचवड: चाकणजवळ संतोषनगर वाकी येथे भाम नदीच्या पुलावर काल दुपारी (दि. २१/०५/२०२५) सुमारे दोन वाजता झालेल्या एका गंभीर अपघातात राहुल पोपट कड (वय ३९ वर्षे, रा. संतोषनगर पोस्ट वाकी, ता. खेड, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी ट्रकचालक दुर्गाप्रसाद रामजी विश्वकर्मा (वय ४२ वर्षे, रा. बैरीबीसा, ता. ग्यानपूर, जि. भदोही, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर शिवाजी कड (वय २३ वर्षे) यांचे चुलते राहुल कड हे त्यांच्या स्प्लेंडर गाडी क्रमांक एमएच १२ एम जे ५२७४ वरून चाकणहून संतोषनगर वाकीकडे जात होते. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रक क्रमांक डी डी ०१ झेड ९६९३ च्या चालकाने निष्काळजीपणे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत राहुल कड गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या प्रकरणी मयूर कड यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक दुर्गाप्रसाद विश्वकर्मा याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम-२८१, १०६ (१) सह मोवाकाक १८४, १३४, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोहवा ढवळे करत आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------
#RoadAccident #Chakan #Pune #FatalAccident #PoliceInvestigation #TrafficRules #NegligentDriving

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: