मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांनी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग (कोस्टल रोड) वरील वाहतुकीत काही तात्पुरते बदल केले आहेत.
कोस्टल रोड हा जलद वाहतुकीसाठी बांधण्यात आला असून, तो २६ जानेवारी २०२५ पासून मरीन ड्राईव्ह, वत्सलाबाई देसाई चौक आणि सी लिंक टोल प्लाझापर्यंत खुला करण्यात आला आहे.
या बदलांनुसार, जे. के. कपूर चौकातून सुरू होणारा अंडरपास/सबवे ३० मे २०२५ पासून दररोज सकाळी ७:०० ते रात्री १२:०० पर्यंत चारचाकी आणि प्रवासी बससाठी खुला राहील.
वाहनांसाठी वेगाची मर्यादा ४० कि.मी. प्रति तास निश्चित करण्यात आली आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- #Mumbai #Traffic #CoastalRoad #TrafficRules #Maharashtra #MumbaiTraffic
Reviewed by ANN news network
on
५/३१/२०२५ ०५:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: