पिंपरी-चिंचवड: माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल नाना काटे यांनी पावसाळ्यापूर्वी शहरातील स्ट्रॉम वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन आणि नाल्यांची तातडीने सफाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
पत्रामध्ये म्हटले आहे की, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेकडून शहरातील स्ट्रॉम वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन आणि नालेसफाई केली जाते. परंतु, यावर्षी अद्याप कोणतेही काम सुरू झालेले दिसत नाही. सध्या अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहन चालवणे आणि रस्त्याने चालणे कठीण झाले आहे. तसेच, साचलेल्या पाण्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
विठ्ठल नाना काटे यांनी म्हटले आहे की, अवकाळी पावसामुळे जर शहराची ही अवस्था असेल, तर मोठ्या पावसाळ्यात संपूर्ण शहर जलमय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी आयुक्तांना तातडीने लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी शहरातील स्ट्रॉम वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन आणि नाले साफ करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्याची विनंती केली आहे.
------------------------------------------
#PimpriChinchwad
#DrainCleaning
#Monsoon
#PMC
#ExOppositionLeader
#Waterlogging
#CityProblems
Reviewed by ANN news network
on
५/१५/२०२५ ०५:१९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: