शतपावली करताना अपघाताचे शिकार
पुणे, दि. 19 मे 2025: मारुंजी येथे एका हृदयद्रावक घटनेत, भरधाव दुचाकीच्या धडकेत रत्नागिरी जिल्ह्यातील एका व्यक्तीचा बळी गेला आहे. चंद्रकांत अर्जुन पावरी (वय 53, मूळ रा. गुहागर, जि. रत्नागिरी) असे दुर्घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मारुंजी येथील सेव्हन स्टार लेन परिसरात शतपावली करत असताना एका बेदरकार दुचाकीस्वाराने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातानंतर दुचाकीचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
या दुर्दैवी घटनेची माहिती चंद्रकांत पावरी यांची मुलगी वशाखा चंद्रकांत पावरी (वय 23) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. वशाखा या मारुंजी येथे नोकरी करतात आणि बुचडे पाटील सोसायटीत आपल्या वडिलांसोबत राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 18 मे रोजी रात्री 10:30 वाजता त्या, त्यांचे वडील चंद्रकांत आणि काका नरेंद्र बेंदरकर जेवणानंतर घराच्याजवळ असलेल्या सेव्हन स्टार लेनमध्ये गरुडा ओयो बिल्डिंगसमोर शतपावली करत होते.
यावेळी मागून आलेल्या MH-12 TL-0912 क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून त्यांच्या वडिलांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात चंद्रकांत पावरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडवल्यानंतर आरोपी चालक आपले वाहन घटनास्थळी सोडून पळून गेला.
या घटनेमुळे मारुंजी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 281, 125(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम 184, 119/177, 134(अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पांचाळ (मोबाईल: 8928376100) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आपल्या माणसाला अशा प्रकारे गमावल्याने पावरी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फरार दुचाकीचालकाला लवकरात लवकर पकडून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

--------------------------------------------
#HitAndRun #RoadAccident #MarunjiRoad #HinjewadPolice #FatalAccident #TrafficViolation #RoadSafety #PunePolice
मारुंजीत भरधाव दुचाकीची धडक; रत्नागिरीतील व्यक्तीचा मृत्यू
Reviewed by ANN news network
on
५/२१/२०२५ ०४:०५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: