वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
पुणे, १७ मे २०२५: भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तक्रारदाराचे त्यांच्या वडिलांनी चुकून दुसऱ्या व्यक्तीला पाठवलेले ७५ हजार रुपये अवघ्या १० मिनिटांत मिळवून परत दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे २०२५ रोजी एका व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली. तक्रारदाराच्या वडिलांनी सकाळी ८:४५ वाजता ७५ हजार रुपये घाईगडबडीत आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीच्या खात्यावर पाठवले होते. आणि तो व्यक्ती तक्रारदाराला त्याचे पैसे परत देण्यास टाळाटाळ करत होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगावकर यांनी तातडीने दखल घेत पोलीस अंमलदार राहुल बांडे आणि दीपक शेंडे यांना तक्रारदाराला त्याची रक्कम परत मिळवून देण्यासाठी सूचना दिल्या. त्यानुसार, पोलीस अंमलदार राहुल बांडे आणि दीपक शेंडे यांनी त्वरित आंध्र प्रदेशातील त्या व्यक्तीशी संपर्क साधला आणि त्याला पोलीस असल्याची खात्री पटवण्यासाठी व्हाट्सअप व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर, त्या व्यक्तीने अवघ्या दहा मिनिटांत तक्रारदाराला ७५ हजार रुपये परत केले.
अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे यांनी या कामगिरीसाठी पोलिसांचे अभिनंदन केले.
--------------------------------------------------------------------------
#PunePolice #FinancialAssistance #QuickResponse #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा