राज्य सरकार पुढाकार घेणार असल्याची मराठी भाषा मंत्री श्री.उदय सामंत यांची माहिती; पुणे पुस्तक जत्रेचा थाटात शुभारंभ
पुणे : मुलांना वाचनाची गोडी लावणारी बाल पुस्तक जत्रा ही पुण्यापुरती राहता कामा नये, तर तिचा प्रसार राज्यभरात व्हायला हवा. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बाल पुस्तक जत्रेचे आयोजन व्हायला हवे. त्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री श्री. उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका आणि संवाद पुणे यांच्या वतीने आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेच्या उद्घटनाप्रसंगी श्री. उदय सामंत बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष श्री. मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक श्री. राजेश पांडे, महापालिकेचे अधिकारी श्री सुनील बल्लाळ, श्री.राजेश कामठे, ज्येष्ठ उद्योजक श्री.कृष्णकुमार गोयल, बुलढाणा अर्बन को क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शिरीष देशपांडे, लेखिका संगीता बर्वे, ज्येष्ठ चित्रकार श्री.ल. म. कडू, बालसाहित्यकार श्री.राजीव तांबे, संवाद पुणेचे श्री.सुनील महाजन, प्रसेनजित फडणवीस आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या स्मृतिपित्त उभारलेल्या जालनाचे उद्घाटन करण्यात आले. या दालनात प्रकाशकांची साधारण ७० पुस्तकांची दालने असून, त्यात बालसाहित्याला वाहिलेल्या दालनांचा समवेश आहे.
श्री. सामंत म्हणाले की, पूर्वीची लहान मुले आणि आताची लहान मुले यांच्यातील फरक आपला स्पष्ट जाणवतो. पूर्वीच्या मुलांना आजार होत नाही, तर आताच्या मुलांची प्रकृती फार लवकर बिघडते. पुस्तकांची जत्रा नावीन्यपूर्ण उपक्रम असून, त्याला जोड भारतीय पारंपरिक खेळांची दिल्याने मुलांसोबतच पालकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. हा उपक्रम पुढे नेण्यासाठी मराठी भाषेला पाठबळ देणारा मित्र उदय सामंतसोबत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत. त्यामुळे पुणे पुस्तक बालचत्रेसारखे उपक्रम राज्यभरात उत्साहाने पडावेत, अशी इच्छा सामंत यांनी व्यक्त केली.
मिसाळ म्हणाल्या की, लहानपणी भरपूर खेळ खेळल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो, हे आज कळतं आहे. आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासोबतच आपल्या व्यक्तिमत्त्वात भर पडते. अशाच पद्धतीने लहानपणी पुस्तके वाचण्याची सवय लागली. त्याचा फायदा आज होत असून, अनेक ऐतिहासिक पुस्तके आपण वाचलेली असतात. पुस्तक हातात घेऊन, वाचण्याची गंमत लॅपटॉप किंवा संगणकावर वाचून मिळत नाही. त्यामुळे मुलांनी वाचण्यासोबतच पारंपारिक भारतीय खेळ खेळण्यावर भर द्यायला हवा.
पांडे म्हणाले की, दिल्ली येथे भरणाऱ्या येथे वर्ल्ड बुक फेअरमध्ये मुलांसाठी शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रम राबविण्याबाबत कल्पना सुचली. या कल्पनेचे पुणे पुस्तक बाल जत्रेत रूपांतर करण्यात आले. पुणेकरांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे येत्या रविवारपर्यंत पुणे पुस्तक बाल जत्रेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पांडे यांनी केले. पुणे पुस्तक महोत्सवाप्रमाणे राज्यात नागपूर आणि आणखी काही शहरात पुस्तक महोत्सव होणार असल्याचे मिलिंद मराठे यांनी सांगितले.खडकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन केले
पाटील म्हणाले की, भारतीय खेळ खेळल्याने मुलांचे आरोग्य चांगले राहते. मुलांच्या बुद्धीचा विकास भरपूर होतो. मुलांचे व्यक्तिमत्त्व विकास चांगल्या पद्धतीने होतो. त्यामुळे पारंपरिक खेळ खेळण्याचा मुलांनी प्रयत्न करायला हवा आणि त्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यायला हवे. राजेश पांडे यांनी राजकारणासोबतच साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करीत असून वाचन संस्कृती वाढण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करीत आहेत. अशा उपक्रमांना राज्य सरकारचा नेहमीच पाठिंबा राहील, अशी माहिती पाटील यांनी दिली
-------------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: