सोमवार, १९ मे, २०२५

एम.डी. विक्री करणाऱ्या टोळीला अटक, १३ कोटींचे मेफेड्रोन जप्त

 


मुंबई: अंमली पदार्थ विरोधी पथक, परिमंडळ ०६, आणि आर.सी.एफ. पोलीस ठाणे, दहशतवाद विरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई करत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत एकूण ६ किलो ६८८ ग्रॅम वजनाचा, अंदाजे १३,३७,६०,०००/- रुपये किंमतीचा एम.डी. (मेफेड्रोन) या अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

१९ मार्च, २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक, परिमंडळ ०६, आणि दहशतवाद विरोधी पथक, आर.सी.एफ. पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. त्यावेळी, अंमली पदार्थाची विक्री करणारा एक संशयित व्यक्ती आढळला. त्याच्याकडून ४५ ग्रॅम वजनाचा, अंदाजे ४,५०,०००/- रुपये किंमतीचा एम.डी. जप्त करण्यात आला. याप्रकरणी आर.सी.एफ. पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५९/२०२५, कलम ०८ (क) सह २२ एन.डी.पी.एस. ऍक्ट १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, एम.डी. या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या टोळीतील एकूण ५ आरोपींना मुंबई आणि नवी मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून साठवलेला ६ किलो ६८८ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन), ज्याची किंमत अंदाजे १३,३७,६०,०००/- रुपये आहे, तो जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध अजून चालू आहे.

ही  कामगिरी पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई  देवेन भारती, सह पोलीस आयुक्त  सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग डॉ.  महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०६   नवनाथ ढवळे, आणि सहायक आयुक्त, ट्रॉम्बे विभाग  राजेश बाबशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समशेर तडवी, स.पो.नि. मैत्रानंद विष्णू खंदारे, पो.उप.नि. गणेश कर्चे, स.पो.उप.नि. वाणी, पो.हवा. ०७१५००/पाटील, पो.हवा. ०६०५४३/खैरे, पो.शि. ०८१०१६/येळे, पो.शि. ०९०१०७३/केदार, पो.शि. १११२८६/माळवे, पो.शि. १४०४७७/सानप, आणि पो.शि. १३०२८४/राऊत यांनी केली आहे.

--------------------------------------------------------------------------------

 #MumbaiCrime #DrugSeizure #Mephedrone #MD #Narcotics #MumbaiPolice #CrimeNews #महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा