१५ किलो गांजा आणि गाडी जप्त
पुणे: चाकण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईत १५ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे, २०२५ रोजी चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील वाकी खुर्द येथे हॉटेल भाम किनाराजवळ पोलिसांनी कारवाई केली. आरोपी कुमार बबन मोहिते याला १५,१२० ग्रॅम गांजा, एक चारचाकी गाडी आणि एक मोबाईल फोनसह ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान, आरोपी कुमार मोहिते याने हा गांजा साईसिंग पावरा (रा. शिरपूर, धुळे) याच्याकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी कुमार मोहिते याला अटक केली असून, साईसिंग पावरा फरार आहे.
या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बोरकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.
---------------------------------------------------------
#PuneCrime #DrugSeizure #Ganja #Narcotics #Maharashtra #PunePolice #अंमलीपदार्थ #गुन्हेगारी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा