पुणे: येरवडा पोलिसांनी बसमध्ये चोरी करणाऱ्या एका २४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. सुशांत शंकर गायकवाड असे आरोपीचे नाव असून तो खराडी येथील साईनाथ नगरचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १,२५,०००/- रुपये किंमतीची सोन्याची चैन जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे २०२५ रोजी येरवडा परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना एका व्यक्ती सोन्याची चैन विकायला आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सुशांतला पकडले. चौकशीत त्याने येरवडा भागात बसमध्ये सोन्याची चैन चोरल्याची कबुली दिली.
या कामगिरीसाठी पोलीस आयुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके आणि तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------- #Pune #Yerwada #BusTheft #Arrest #Crime #MaharashtraPolice #GoldChain
Reviewed by ANN news network
on
५/३०/२०२५ १०:५१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: