पुणे - खडकी परिसरातील एल्फीस्टन रोडवर मंगळवार संध्याकाळी एका ६५ वर्षीय व्यक्तीच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांची सोन्याची चेन चोरी झाली. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २८ मे २०२५ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता ही घटना फॅड्रीक्स बंगला परिसरात घडली. फिर्यादी पायी चालत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याजवळ येऊन गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि पळून गेला.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेदंगुडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. पोलीस चोराचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण करत आहेत.
गेल्या काही दिवसांत पुणे शहरात अशा प्रकारच्या सोन्याच्या दागिने चोरीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
#PuneNews #GoldChainTheft #KhadkiPolice #CrimeNews #PunePolice #ChainSnatching #PuneCrime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: