स्वारगेट केबल अपघात: तातडीने कारवाई आणि केबल ऑडिट करा; भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी

 

पुण्यात असुरक्षित केबल्सचा धोका; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे, दि. २० मे २०२५: पुणे शहरातील स्वारगेट परिसरात आज इंटरनेटच्या तुटलेल्या केबलचा भाग खाली पडून एका नागरिकाला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे शहरात केबलच्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, तातडीने कारवाई आणि संपूर्ण शहरात केबल ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटला जात असताना घडलेल्या या अपघातात एक नागरिक थोडक्यात बचावला. अशा घटना केवळ दुर्लक्ष किंवा व्यवस्थेतील निष्काळजीपणा दर्शवतात, असे नाही, तर त्या नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करतात, असे घाटे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिकेच्या विद्युत अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदनात धीरज घाटे यांनी खालील मुद्दे मांडले:

  • पुणे शहरातील अनेक भागांमध्ये इंटरनेट आणि केबल टीव्हीच्या अनधिकृत तारा बिनधास्तपणे उभारल्या गेल्या आहेत, ज्यांची देखभाल किंवा तपासणी केली जात नाही.
  • शहरातील सर्व सार्वजनिक रस्ते, चौक आणि गल्लीतील केबल्सचे तातडीने तांत्रिक ऑडिट करण्यात यावे.
  • अनधिकृतपणे टाकलेल्या किंवा धोकादायक स्थितीत असलेल्या केबल्सची यादी तयार करून त्यावर तातडीने कारवाई करावी.
  • संबंधित कंपन्यांना नोटीस देऊन त्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना निश्चित करावी.
  • नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेने एक विशेष हेल्पलाइन क्रमांक किंवा पोर्टल सुरू करावे, जिथे नागरिक अशा धोकादायक केबल्सची माहिती देऊ शकतील.

या शिष्टमंडळात माजी नगरसेविका मानसी देशपांडे, सुशील मेंगडे, विशाल पवार, प्रतुल जागडे आणि विजय गायकवाड यांचा समावेश होता. विद्युत विभागाच्या श्रीमती शेकटकर यांनी महानगरपालिकेच्या वतीने निवेदन स्वीकारले.

----------------------------------------------------------------------------------------------------

#Pune #CableAccident #IllegalCables #Safety #BJP #PMC #Audit #MaharashtraNews #PuneNews

स्वारगेट केबल अपघात: तातडीने कारवाई आणि केबल ऑडिट करा; भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी स्वारगेट केबल अपघात: तातडीने कारवाई आणि केबल ऑडिट करा; भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी Reviewed by ANN news network on ५/२०/२०२५ ०६:१०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".