पुणे: कोथरूड परिसरात एका ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये १६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च ते १४ मे २०२५ दरम्यान एका मोबाईल धारकाने फिर्यादीशी संपर्क साधला. त्याने स्वतःला शेअर ट्रेडिंग कंपनीचा एजंट असल्याचे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. "खात्रीशीर नफा मिळवून देतो" असे खोटे आश्वासन देऊन त्याने वृद्धाकडून १६ लाख रुपये उकळले.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्री. माने हे करत आहेत.
------------------------------------------------------------------------------
#Pune #Crime #Fraud #CyberCrime #SeniorCitizen #Kothrud #OnlineTrading
Reviewed by ANN news network
on
५/२०/२०२५ ०५:५७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: