पत्नी आणि प्रियकराने मिळून केला पतीचा खून

 


ॲन्टॉप हिल पोलिसांनी ४ तासात उघडकीस आणला गुन्हा

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी): मुंबईतील ॲन्टॉप हिल परिसरात एका खुनाच्या गुन्ह्याची उकल पोलिसांनी अवघ्या चार तासांत केली आहे. मयत इस्माईल अली शेख (वय ३७) याचा खून त्याची पत्नी सुमय्या इस्माईल अली शेख (वय २६) आणि तिचा प्रियकर सकलाईन गोलम किब्रिया शेख (वय २७) यांनी मिळून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे २०२५ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राजीव गांधी नगर झोपडपट्टीतील सार्वजनिक कचराकुंडीसमोर इस्माईल अली शेख याचा मृतदेह आढळून आला होता. यासंदर्भात निजाम अख्तार शेख (वय ३८) यांनी ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

तपासादरम्यान पोलिसांना मयत इस्माईलची पत्नी सुमय्यावर संशय आला. तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, तिने प्रियकर सकलाईनच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सकलाईन मिरा दातार दर्गा परिसरातील झोपडपट्टीत राहत होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

आरोपी सुमय्या आणि सकलाईन यांच्यात अनैतिक संबंध होते आणि इस्माईल त्यांच्या संबंधात अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी मिळून त्याचा खून करून मृतदेह गॅलरीत ठेवल्याची कबुली दिली. या कामगिरीसाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त गणेश गावडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र थिवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्चना पाटील आणि त्यांच्या टीमने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.



  • #MumbaiCrime
  • #MurderCase
  • #AntopHill
  • #ExtramaritalAffair
  • #CrimeSolved
  • #PoliceInvestigation
  • #MumbaiPolice
पत्नी आणि प्रियकराने मिळून केला पतीचा खून पत्नी आणि प्रियकराने मिळून केला पतीचा खून Reviewed by ANN news network on ५/२९/२०२५ ०७:२७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".