पुण्यात तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक


पुणे :   भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करुन कात्रज परिसरातील शनिनगर येथे राहणाऱ्या  तिघा बांगलादेशी नागरिकांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

हलाल अश्रफ खान (वय ३३), सोहेल खोका शेख (वय ३२) आणि लामिया अल्ताफ हवालदार (वय ३२, तिघे मूळ रा. बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम आणि परकीय नागरिक आदेश कलमांन्वये आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक रतिकांत चंद्रशा कोळी यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 बांगला देशातून भारतात घुसखोरी करणारे नागरिक प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये प्रथम येतात कोलकत्ता येथील दलालाकडून बनावट भारतीय कागदपत्रे तयार करुन घेतात त्यानंतर ते देशातील विविध शहरांमध्ये जात असतात हलाल खान, शेख, हवालदार हे पंधरा दिवसांपासून पुण्यातील शनिनगर येथील जय शिव मल्हार सोसायटीतील एका घरामध्ये ते रहात होते. याबाबतची माहिती आंबेगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने आणि पथकाने कारवाई करुन तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाइल  आणि बांगलादेशी नागरिकत्वाचे ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे कोणतेच भारतीय ओळखपत्र नव्हते. आरोपींनी त्यांच्या मोबाइलवरून बांगलादेशात संपर्क साधल्याची कबुली दिली आहे.  त्यांच्याकडे कोणतेही भारतीय ओळखपत्र मिळून आले नाही.

हलाल खान हा मिळेल तेथे मोल मजुरी करतो़ २०२० मध्ये त्याला नवी मुंबईतील बेलापूर पोलिसांनी बांगला देशी असल्यावरुन अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाकडून जामीन मिळाला असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या म्हणण्याची पोलीस तडताळणी करीत आहेत. सहायक पोलीस फौजदार भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.

-------------------------------------------------------------------------------

#PunePolice #IllegalImmigration #BangladeshNationals #ForeignersAct #IllegalStay #KatrajPune #ImmigrationLaw #PuneNews #CrimeNews #BorderSecurity


पुण्यात तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक पुण्यात तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक Reviewed by ANN news network on ५/१७/२०२५ ०५:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".