उल्हासनगर: उल्हासनगर सेंट्रल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका नाबालिक मुलावर सार्वजनिक शौचालयात लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सेंट्रल पोलिसांनी आरोपी अमित कोतपे याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा गुरुवारी दुपारी १:०० वाजता सार्वजनिक शौचालयात गेला होता. तेथे आरोपी अमित कोतपे याने त्याला धमकावून लैंगिक अत्याचार केला. मुलाची स्थिती पाहून त्याच्या पालकांनी विचारपूस केली असता ही बाब उघडकीस आली.
पीडित मुलाच्या नातेवाइकांनी सेंट्रल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित कोतपे हा काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पीडित मुलाला वैद्यकीय उपचार व समुपदेशन देण्यात येत आहे. सेंट्रल पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे.
-----------------------------------------------
#UlhasnagarPolice #CrimeAgainstMinors #SexualAssault #ChildSafety #CriminalArrest #MaharashtraPolice #ChildProtection #CrimeNews #JuvenileVictim #PublicSafety
Reviewed by ANN news network
on
५/१७/२०२५ ०६:११:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: