कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही - आमदार जगताप
चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना जाणून घेण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी प्रेरणा शाळा मैदान, भोंडवे नगर येथे भव्य मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना आमदार जगताप म्हणाले की, विकास आराखड्याला अंतिम रूप देताना नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे आहे.
महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्यात १२, १५ आणि २४ मीटर रुंदीचे रस्ते प्रस्तावित आहेत. यामुळे अनेक नागरिकांच्या घरांवर परिणाम होणार असून काहींना विस्थापित होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या हरकती व सूचना नोंदवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार शंकर जगताप यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि आश्वासन दिले की, कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. कोणतीही योजना लोकांच्या हितासाठीच असली पाहिजे, असे ते म्हणाले.
मेळाव्याचे आयोजन नीलेश भोंडवे, बिभीषण चौधरी, मनोज तोरडमल, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे, नाना शिवले, धनंजय वाल्हेकर, सचिन शिवले, आदेश नवले, कविताताई दळवी, दीपक वाल्हेकर, प्रवीण वाल्हेकर, वाल्मिक शिवले, दत्ताभाऊ ढगे, तुषार वाल्हेकर, नीलेश वाल्हेकर, पाटीलबुवा चिंचवडे, खंडुदेव कथारे, चंद्रहास वाल्हेकर, अनिकेत क्षीरसागर आणि वाल्हेकरवाडीच्या नागरिकांनी केले होते.
या मेळाव्यात नागरिकांनी आपल्या समस्या आणि अपेक्षा लोकप्रतिनिधींसमोर मांडल्या. आमदार शंकर जगताप नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
---------------------------------------------------------------------------------------------
#Maharashtra #PimpriChinchwad #DevelopmentPlan #PublicMeeting #ShankarJagtap #CitizenConcerns
Reviewed by ANN news network
on
५/२७/२०२५ ०६:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: