मुंबई : भारताच्या रत्न व दागिने क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरवत, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ मे २०२५ रोजी हँड-कॅरेज दागिन्यांच्या निर्यातीस सुरुवात होणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स (सीबीआयसी) ने २८ मार्च २०२५ रोजी परिपत्रक क्रमांक ०९/२०२५-कस्टम्स द्वारे या प्रक्रियेचे औपचारिक फॉर्मलायझेशन केले आहे.
२४ एप्रिल २०२५ रोजी मुंबईत मॉक ड्रिलचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये भारत डायमंड बोर्स, बीव्हीसी, प्रेशियस कार्गो कस्टम्स क्लियरन्स सेंटर (पीसीसीसीसी), विमानतळ कस्टम्स आणि जीजेईपीसी यांनी सक्रिय सहभाग घेतला. अतिरिक्त आयुक्त रूपेश सुकुरामन यांच्या देखरेखीखाली हा प्रयोग पार पडला. जीजेईपीसीच्या सचिवांनी निर्यातदाराची भूमिका पार पाडली.
या उपक्रमाबद्दल जीजेईपीसीचे अध्यक्ष डॉ. किरीट भन्साळी म्हणाले, "मुंबई विमानतळावरून हँड-कॅरेज दागिन्यांची निर्यात सुरू होत असल्यामुळे भारताच्या रत्न व दागिने व्यापारात नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. या सुविधेमुळे विशेषतः लहान व नवोदित निर्यातदारांना लॉजिस्टिक्सची मोठी सोय होणार आहे."
जीजेईपीसीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही योजना प्रत्यक्षात आली आहे. भविष्यात डीजी यंत्रणांकडून सल्लागार सूचना (Advisory) जारी केल्यावर मुंबई कस्टम्सकडून हँड-कॅरेज निर्यातीसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) जारी होणार आहे.
या सुविधेमुळे उदयोन्मुख निर्यातदारांना त्यांच्या मौल्यवान दागिन्यांची स्वतः ने-आण करून जागतिक बाजारपेठेत प्रवेश करता येईल. यासाठी जीजेईपीसीने विमानतळावर सदस्यांना सहकार्य करण्यासाठी विशेष कार्यालय उभारले आहे.
जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) ही संस्था भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने १९६६ साली स्थापन केली. ही संस्था देशाच्या रत्न व दागिने क्षेत्राचा सर्वोच्च प्रतिनिधी असून, आज १०,६०० हून अधिक सदस्य यामध्ये सामील आहेत. मुख्यालय मुंबईत असून दिल्ली, कोलकाता, चेन्नई, सूरत आणि जयपूर येथे प्रादेशिक कार्यालये आहेत. १९९८ पासून संस्थेला स्वायत्त दर्जा मिळाला आहे. GJEPC रत्न व दागिने उद्योगाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढीसाठी आणि सदस्यांना सेवा देण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे.
#JewelleryExport
#MumbaiAirport
#HandCarryExport
#GJEPC
#BharatRatnaIndustry
#MSMEIndustry
#ANNNewsNetwork
#GemAndJewelleryExport
#IndiaJewelleryMarket
#MumbaiGhadamodi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: