प्रत्यक्ष कृतीतून घेतले अमूल्य शिक्षण
पुणे :पुण्याच्या उन्हाळी खासियत असलेल्या 'पॉट आईस्क्रीम'च्या निर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी जॅक एन जिल प्री-स्कुल आणि लिटिल होम डे केअरच्या बालचमूला मिळाली. उन्हाळी शिबिराच्या निमित्ताने शनिवार, २६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेचार वाजता कमला नेहरू उद्यानाजवळील शिरीष बोधनी यांच्या आईस्क्रीम सेंटरला ही शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली.
या सहलीत एकूण ४० विद्यार्थी आणि १० शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. संस्थेच्या संस्थापिका ज्योत्स्ना गटणे, मानसी कुलकर्णी व भारती कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती.
शिरीष बोधनी यांनी विद्यार्थ्यांना पॉट आईस्क्रीमची संपूर्ण निर्मिती प्रक्रिया प्रत्यक्ष कृतीद्वारे समजावून सांगितली. लाकडी पॉटमध्ये आईस्क्रीम तयार करताना वापरले जाणारे पदार्थ, वेगवेगळे प्रकार, लागणारा वेळ याबाबत माहिती दिली. बर्फ आणि मीठाच्या सहाय्याने पॉट फिरवून हाताने केलेल्या आईस्क्रीमच्या चविष्ट अनुभवाचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला.
'पॉट आईस्क्रीम'ची खास लज्जत
पुण्याच्या उन्हाळ्याला अनेक दशकांपासून 'पॉट आईस्क्रीम'ने एक वेगळीच लज्जत प्राप्त करून दिली आहे. वाड्यात सहकुटुंब पॉट फिरवत घरोघरी आईस्क्रीम तयार करण्याची पारंपरिक पद्धत पुणेकरांच्या जिव्हाळ्याची ठरली होती.
शिरीष बोधनी यांनी अनेक वर्षांपूर्वी घरोघरी पॉट आईस्क्रीम पोहोचवण्याची सेवा सुरू केली. काळाच्या ओघात इतर व्यावसायिक थांबले असले तरी बोधनी यांनी ही परंपरा जपली आहे. शुद्ध दूध व अस्सल फ्लेवरमुळे बोधनी यांचे पॉट आईस्क्रीम आजही पुणेकरांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
या आईस्क्रीममध्ये कोणतीही भेसळ नाही तसेच कृत्रिम पदार्थ न वापरता नैसर्गिक चव टिकवली जाते. त्यामुळेच आजही मूळ स्वाद जपणारे पॉट आईस्क्रीम पुण्याच्या उन्हाळ्यातील अविभाज्य भाग ठरले आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
#PotIceCream
#StudentCamp
#PuneGhadamodi
#ANNNewsNetwork
#InnovationinEducation
#SummerCamp
#Children'sCampExperience
#PuneNews
#SummerCamp2025
#LearningByDoing

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: