या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी, पर्यवेक्षिका राधा केतकर तसेच मराठी विभागातील शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कथा लेखन व कथाकथन कौशल्य विकसित व्हावे, सभेत आत्मविश्वासाने संवाद साधता यावा, वक्तृत्व कला फुलावी आणि व्यक्तिमत्त्व विकास घडावा या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
व्याख्यानात श्याम भुर्के यांनी कथा कशी लिहायची, ती प्रभावीपणे कशी सांगायची, सभेत आत्मविश्वासाने कसे बोलायचे, संधीचे सोने करून नेहमी सकारात्मक दृष्टिकोनाने 'हो' कसे म्हणायचे, यश मिळवण्यासाठी अभ्यास आणि व्यायामाचे महत्त्व काय आहे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पुणे शहराच्या महत्त्वाची आणि थोर साहित्यिक व कर्तबगार व्यक्तींच्या उदाहरणांद्वारे प्रेरणा दिली.
विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना त्यांनी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनीही प्रेरणादायी कथा सांगत, प्रश्नांची उत्तरे देत व्याख्यानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून स्वाक्षऱ्याही घेतल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका विजया जोशी आणि पर्यवेक्षिका राधा केतकर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना श्याम भुर्के यांच्या व्याख्यानाचे महत्त्व पटवून दिले. व्याख्यानाचे सूत्रसंचालन राघवेंद्र गणेशपुरे यांनी केले, तर प्राची कुलकर्णी व कांचन सोलापूरकर यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका विजया जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: