युवराज संभाजी छत्रपतींच्या उपस्थितीत भापकर यांचा प्रचार
शेतकरी नेते राजू शेट्टी, बच्चू कडू यांचा भापकर यांना पाठिंबा
चिंचवड (प्रतिनिधी) -चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वराज पक्षाचे अधिकृत उमेदवार मारुती साहेबराव भापकर यांना महाराष्ट्रातील विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्यासह अनेक नेत्यांनी व्हिडिओ आणि ऑडिओ संदेशाद्वारे भापकर यांना पाठिंबा दिला आहे. विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकळे यांनीही त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.
काल (१६ नोव्हेंबर) युवराज संभाजी छत्रपती यांनी पिंपरी-चिंचवड शहरात जाहीर सभा घेऊन भापकर यांच्या प्रचाराला गती दिली. भापकर यांनी सायकल, दुचाकी आणि रिक्षातून प्रचार करत आपला कार्य अहवाल आणि हमीपत्र मतदारांपर्यंत पोहोचवले आहे.
"मी ही निवडणूक कोणाचीही मते कमी किंवा जास्त करण्यासाठी नव्हे, तर केवळ जिंकण्यासाठी लढत आहे," असे भापकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी मतदारांना निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पसरवल्या जाणाऱ्या अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानात अनुक्रमांक ४ वर असलेल्या "सप्तकिरणांसह पेनाची नीब" या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन भापकर यांनी मतदारांना केले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१७/२०२४ ११:०७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: