चिंचवडच्या पवना घाटावर छठपूजेचा भक्तिमय सोहळा

 


चिंचवड : चिंचवडगावातील पवना नदी घाटावर हनुमान मित्र मंडळ आणि छठ पूजा समितीतर्फे उत्तर भारतीयांचा दोन दिवसीय छठपूजा उत्सव दिमाखात साजरा झाला.

मोठ्या संख्येने उत्तर भारतीय कुटुंबांनी गुरुवारी भक्तिभावाने सूर्योपासना केली. शुक्रवारी सकाळी पवनामाईच्या पाण्यात उभे राहून सूर्योदयाची वाट पाहत सूर्यदेवाला अर्घ्य दिले.

छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांनी वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे पवना घाटाचा विस्तार करण्याची मागणी केली. "पुढील वर्षी तरी महापालिकेने सुसज्ज घाट उपलब्ध करून द्यावा," असे ते म्हणाले.

कार्यक्रमात जितेंद्र गुप्ता, शशिकांत श्रीवास्तव, देवानंद गुप्ता यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

चिंचवडच्या पवना घाटावर छठपूजेचा भक्तिमय सोहळा चिंचवडच्या पवना घाटावर छठपूजेचा भक्तिमय सोहळा Reviewed by ANN news network on ११/०७/२०२४ १०:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".