भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात रुपीनगर-तळवडे भागातील रणरागिनींची "महाआघाडी" मैदानात उतरली असून, महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही निवडणूक महिला शक्तीने हाती घेतल्याचे चित्र दिसत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी बाईक रॅली काढण्यात आली. भगवे फेटे परिधान केलेल्या रणरागिणींनी "राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी" असे म्हणत गव्हाणेंना विजयी करण्याचे आवाहन केले.
रुपीनगर शिवसेना कार्यालयात महिलांनी ढोल-ताशांच्या गजरात गव्हाणेंचे जंगी स्वागत केले. नुकतेच पक्षात आलेले सारिका व संतोष लांडगे यांचीही उपस्थिती होती.
"माय-माऊलींच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित असून त्यांच्या सुरक्षा, आरोग्य आणि शिक्षणावर विशेष लक्ष देणार," असे गव्हाणे म्हणाले.
गव्हाणेंच्या प्रचाराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ १०:३६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ १०:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: