वाकड : "गोरगरिबांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोफत शिक्षण देण्यासाठी विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी शैक्षणिक संकुले उभारण्याची योजना आहे," असे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी सांगितले.
पुनावळेतील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. "वाकडमध्ये माझ्या संकल्पनेतून सीबीएसई बोर्डची अद्ययावत शाळा उभी राहिली आहे. त्याच धर्तीवर हा प्रकल्प राबवणार," असे ते म्हणाले.
पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी-काळेवाडी, थेरगाव, रावेत-पुनावळे येथे पालिकेच्या आरक्षित जागांवर दर्जेदार शाळा उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्सशी संबंधित कोर्सेस नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्याचा आराखडाही तयार करत असल्याचे कलाटे म्हणाले.
मोफत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाचे कलाटेंचे आश्वासन
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०८:५५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०८:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: