भोसरी : "तळवडे परिसरातील मूलभूत समस्या गेली दहा वर्षे जैसे थे आहेत. या भागातील नागरिकांचा वनवास संपवणार," असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी दिले.
तळवडे भागातील पदयात्रेत ते बोलत होते. भैरवनाथ मंदिरात श्रीफळ वाहून प्रचाराची सुरुवात करण्यात आली.
गव्हाणे म्हणाले, "रेड झोन, अपुरा पाणीपुरवठा, खराब रस्ते आणि वीज पुरवठ्याच्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. या भागातील चारही नगरसेवक राष्ट्रवादीचे असूनही त्यांच्या कामात अडथळे आणले गेले."
माजी आमदार विलास लांडे, शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक पंकज भालेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पंकज भालेकर म्हणाले, "गेल्या दहा वर्षांत तळवडेला निधी देण्यात भेदभाव केला. रेड झोन प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांनी डोळेझाक केली."
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०५:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: