मतदारांच्या समस्या जाणून घेत भोईर यांचा प्रचार
चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी काळेवाडी, थेरगाव आणि रहाटणी परिसरात वैयक्तिक गाठीभेटींद्वारे प्रचार केला. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
नगरसेविका ज्योती भारती, विमल काळे, विजया सुतार यांच्यासह अनेक मान्यवरांना भेटून त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला.
"चिंचवड मतदारसंघात मतदारांची संख्या वाढली, मात्र २४ तास पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी आणि कचरा व्यवस्थापन या समस्या कायम आहेत. या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे," असे भोईर म्हणाले.
काळेवाडी, रहाटणी आणि थेरगाव परिसरात झपाट्याने वाढ होत असून, नागरिकांच्या राहणीमानानुसार सोयीसुविधा मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०५:३४:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: