उरण (प्रतिनिधी) - मॉर्निंग ग्रुप उरण यांच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या पहाटे विमला तलाव परिसरात एक विशेष सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात बबन पाटील यांच्या प्रस्तावनेने झाली. विविध मान्यवरांनी सादर केलेल्या गायनाने कार्यक्रमाला रंगत आणली. उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या कार्यक्रमात प्रकाश मेहता, वैभव म्हात्रे, नितीन पडते, आहिरे सर, गणेश ढोले, उरणकर, मनोज म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
विकास ठाकूर, आनंद बुधे, प्रविण भाई, पाटील अप्पा, मनिष म्हात्रे, दिपक शिगवण, प्रदीप, कल्पेश, नितीन कासारे, मनोज सुतार यांच्यासह गणेश घरत, उत्तम बुंधे, घनश्याम कडू, माऊली, योगेश मोटे, राजेंद्र म्हात्रे आणि जोशी हेही कार्यक्रमास उपस्थित होते.
सर्व उपस्थितांना फराळाचे वाटप करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल वैभव म्हात्रे यांनी आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: