"संत तुकाराम नगरमधून अण्णा बनसोडेंना ७५% मते मिळणार - बहल"
"महायुती कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण - सदाशिव खाडे"
पिंपरी (प्रतिनिधी) - संत तुकाराम नगर येथे होणाऱ्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मते महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मिळतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी महापौर योगेश बहल यांनी व्यक्त केला.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात बनसोडे यांच्या प्रचारार्थ संत तुकाराम नगरात काढण्यात आलेल्या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्र पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
भाजपचे नेते व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी बनसोडेंना ७५-८० टक्के मते मिळतील असा विश्वास व्यक्त केला.
पदयात्रेदरम्यान महिलांनी पुष्पवृष्टी व औक्षण करून शुभेच्छा दिल्या, तर युवक-युवतींनी "अण्णा, पिंपरी पुन्हा", "विजयी भव" अशा घोषणा दिल्या.
तुकाराम पडवळ, जयदेव अक्कलकोट, मायला खत्री, सुनील पालांडे, प्रतिभा जवळकर, निलेश आष्टेकर, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप, ज्ञानेश्वर कांबळे, सतीश लांडगे, हेमंत मोरे, किरण सुवर्णा, संजय अवसरमल, रविंद्र ओव्हाळ, तुकाराम बजबळकर, रमेश चिमूरकर, शिवसेनेचे राजेश वाबळे, दीपक पाटील, दिनेश पाटील, मंगेश धाडगे, अजय चव्हाण, संपत पाचुंदकर, दयानंद पेरकर, राखी धर, राहुल खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०७:००:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: