"वाशिम जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र बनणार"
"पोहरादेवी गडाच्या विकासासाठी ७०० कोटींचा निधी"
वाशिम (प्रतिनिधी) -"विदर्भाच्या विकासाचे काम महायुती सरकारने वेगाने केले असून, पुन्हा सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल," अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम येथील जाहीर सभेत केली.
कारंजा, वाशिम आणि रिसोड मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, दुर्लक्षित असलेल्या वाशिम जिल्ह्याला विकासाच्या केंद्रस्थानी आणले आहे.
समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढली असून, काबरा आणि सावरगाव माळ येथे औद्योगिक विकास केंद्रे उभारून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
रस्ते व पुलांसाठी ९०० कोटी रुपये दिले असून, खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पाला मान्यता देऊन रेल्वे जाळे विस्तारण्याचे काम सुरू आहे.
बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी गडाच्या विकासासाठी ७०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत जे येथे भेट देऊन सेवालाल महाराजांचे दर्शन घेऊन गेले.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०७:०८:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: