राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा काळेवाडीत भव्य मेळावा
वाकड (प्रतिनिधी) -"महाराष्ट्रातील रोजगार आणि गुंतवणूक गुजरातला वळवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवून चिंचवडमध्ये बदल घडवा," असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात करण्यात आले.
महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थनार्थ काळेवाडीत आयोजित मेळाव्यात बोलताना वक्त्यांनी वेदांता, फॉक्सकॉन, सेफ्रॉन इंडिया सारख्या कंपन्या गुजरातला गेल्याचा मुद्दा उपस्थित केला.
कलाटे यांनी बदलत्या जगाच्या गरजांनुसार तंत्रज्ञान व कौशल्यावर आधारित रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीत कौशल्याधिष्ठित शिक्षण आणि उद्योजकतेवर भर असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात महिला शहर अध्यक्ष ज्योती निंबाळकर, युवक शहर कार्याध्यक्ष सागर तापकीर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभेतील सर्वाधिक युवा मतदारांनी सत्तापरिवर्तन आणि राहुल कलाटे यांच्या विजयाचा संकल्प केल्याचे मेघराज लोखंडे यांनी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०६:५३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: