२० हजारांहून अधिक नागरिकांना रासनेंच्या कार्यालयातून मदत
पुणे (प्रतिनिधी) -नागरिकांच्या समस्यांचे निवारण, तत्काळ उपाययोजना आणि विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी हेमंत रासने यांचे जनसंपर्क कार्यालय आधारस्तंभ ठरत असून, त्यांची 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' योजना यशस्वी ठरत आहे.
सदाशिव पेठेतील प्रचार फेरीत बोलताना रासने म्हणाले की, गेल्या दीड वर्षांत भाजपच्या माध्यमातून केलेल्या कामांबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
कार्यालयाच्या माध्यमातून २० हजारांहून अधिक नागरिकांना मदत केली असून, लाडकी बहीण योजनेअंतर्गत १२,००० महिलांना लाभ मिळवून दिला आहे. शासकीय दाखले, आरटीई प्रवेश, निराधार योजनांचा लाभ पाच हजारांहून अधिक नागरिकांना मिळाला आहे.
'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' योजनेअंतर्गत सात हजारांहून अधिक नागरिकांची ड्रेनेज लाईन, शौचालय, रस्ते, जलवाहिनी, पथदिवे अशी विकास कामे मार्गी लावली आहेत.
प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, राघवेंद्र मानकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०७:१३:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: