कसब्यात आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर
पुणे : शहरातील प्रमुख रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी मध्य पुण्यातील महापालिकेच्या आरोग्य सुविधा बळकट केल्या असल्याचा दावा कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी केला.
दत्तवाडी परिसरातील पदयात्रेदरम्यान ते बोलत होते. "महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी पहिले वैद्यकीय महाविद्यालय, कमला नेहरू रुग्णालयात पहिली रक्तपेढी, अतिदक्षता विभाग, बालरुग्णांसाठी हृदयरोग तपासणी केंद्र सुरू केले आहे," असे त्यांनी सांगितले.
चंदुमामा सोनावणे रुग्णालयात नवजात बालकांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग, अत्याधुनिक प्रसूतिगृह आणि डायलेसिस केंद्र सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे बळकट आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमास शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: