पुणे: ज्येष्ठ मराठी साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'सम्भाषा फाउंडेशन' आणि 'बेलवलकर ग्रुप' यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. "दळवी समजून घेताना" या थीम अंतर्गत "दळवींच्या ठणठणपाळचे पुनरावलोकन" या शीर्षकाने हा कार्यक्रम गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता नव्या इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉल, टिळक रस्ता, पुणे येथे होणार आहे.
या कार्यक्रमाबद्दलची माहिती सम्भाषा फाउंडेशनच्या संचालिका चेतना गोसावी यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
कार्यक्रमाची संकल्पना डॉ. मानसी मगीकर यांची असून, या कार्यक्रमात साहित्यप्रेमींना जयवंत दळवींच्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्यातील 'ठणठणपाळ' या कथेचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. प्रसिद्ध लेखिका मंगल गोळबोळे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार असून त्या जयवंत दळवींच्या साहित्याच्या अनोख्या पैलूंवर प्रकाश टाकणार आहेत. जयवंत दळवींच्या विचार आणि सर्जनशीलतेने समृद्ध होण्यासाठी साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सम्भाषा फाउंडेशन व बेलवलकर ग्रुप यांनी केले आहे.
कार्यक्रमाबद्दल माहिती:
जयवंत दळवी जन्मशताब्दी महोत्सव - दळवी समजून घेताना -
दळवींच्या ठणठणपाळचे पुनरावलोकन
तारीख: गुरुवार, १४ नोव्हेंबर
वेळ: सायं. ५:३०
स्थळ: गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे
प्रवेश: विनामूल्य (काही जागा राखीव)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: