भोसरी (विशेष प्रतिनिधी): महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या समर्थनार्थ भोसरी गावठाणात काल झालेल्या प्रचार रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. "आम्हाला खेळ बदलता येतो" आणि "एकी हेच बळ" या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
नुकत्याच फुगे कुटुंबीयांकडून मिळालेल्या पाठिंब्याचे प्रतिबिंब या रॅलीत स्पष्टपणे दिसून आले. माजी नगरसेविका भीमाबाई फुगे आणि सम्राट फुगे यांनी रॅलीचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे गावठाणातील युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत गव्हाणे यांना पाठिंबा दर्शविला.
रॅलीदरम्यान गव्हाणे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. स्थानिक महिलांनी औक्षण करून त्यांना विजयाचा तिलक लावला. परिसरातील विविध मंदिरांमध्ये देवदर्शन घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले.
"दहा वर्षांतील खदखद आता बाहेर पडत असून या परिवर्तनाचा मी केवळ एक चेहरा आहे," असे भावनिक उद्गार गव्हाणे यांनी काढले. "भोसरीकर ठरवतात ते नक्की करतात, हा इतिहास आहे," असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या रॅलीला गावातील ज्येष्ठ पदाधिकारी व मान्यवर नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. युवा कार्यकर्त्यांनी खंबीरपणे पाठिंबा देत गव्हाणे यांच्या विजयाविषयी विश्वास व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: