कलावर्धिनी ट्रस्टतर्फे भव्य कला महोत्सवाचे आयोजन
पुणे : कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्रीमती अरुंधती पटवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने 'मुकुल कला महोत्सव' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड येथे होणार असून यामध्ये विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये सुप्रसिद्ध नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर आणि भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक तथा ज्येष्ठ हार्मोनियम वादक शारंगधर साठे उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात श्री. कृष्णा साळुंके यांच्या शिष्यांचे पखवाज वादन, प्रसिद्ध तबला वादक अजिंक्य जोशी आणि गायिका गायत्री जोशी यांची कन्या आरुषी जोशी यांचे गायन, कथक नृत्यांगना पायल गोखले यांची कन्या रिया गोखले यांचे कथक नृत्य, डॉ. देविका बोरठाकूर यांच्या शिष्यांचे सत्रीय नृत्य आणि श्रीमती अनुजा बाठे यांच्या शिष्यांचे भरतनाट्यम् नृत्य सादर होणार आहे.
कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला असून, कला क्षेत्रातील या युवा प्रतिभांना प्रोत्साहन देण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०१:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: