"चिंचवडच्या विकासासाठी राहुल कलाटेंचे 'अभिवचन'"
पिंपळे निलख (प्रतिनिधी): महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेला महिलांकडून मिळत असलेला प्रतिसाद लक्षणीय ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या पिंपळे निलख-विशाल नगर परिसरातील पदयात्रेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
भैरवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या पदयात्रेत गृहिणींपासून उच्चशिक्षित कार्यरत महिलांपर्यंत सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला. मार्गावर जागोजागी औक्षण करून आणि "रामकृष्ण हरी - वाजवा तुतारी" या घोषणांद्वारे महिलांनी कलाटे यांना पाठिंबा दर्शवला.
महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनाम्यात महिलांसाठी दरमहा ३००० रुपयांची महालक्ष्मी योजना, कृषी समृद्धी, बेरोजगार तरुणांना दरमहा ४००० रुपये भत्ता आणि २५ लाखांचे आरोग्य विमा कवच अशा जनहिताच्या योजनांचा समावेश आहे.
पदयात्रेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, शहराध्यक्ष तुषार कामठे, महिलाध्यक्षा सायली नढे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी चिंचवडच्या विकासासाठी बदलाची गरज व्यक्त केली.
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२४ ११:२७:०० AM
Rating:

.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: