स्व. गुलाबभाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर
जसखार (उरण)(प्रतिनिधी) - गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताअभावी कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये, या उदात्त हेतूने स्व. श्री गुलाबभाई म्हात्रे मित्र मंडळ जसखार यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या रविवार दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत श्री रत्नेश्वरी मंदिर, जसखार येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. स्व. श्री गुलाबभाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या शिबिराद्वारे गरजूंना जीवनदान देण्याचा प्रयत्न केला जातो.
शिबिराचे आयोजक केतन म्हात्रे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी केतन म्हात्रे (फोन क्र. ९८७०९८४५४४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या वार्षिक उपक्रमाद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून गरजूंना रक्ताची उपलब्धता करून देण्यात येत असून, यंदाही मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांचा सहभाग अपेक्षित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: