"गॅरंटी कार्डला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद"
किवळे (प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदारसंघातील २०५ क्रमांकाच्या मतदार संघात महाराष्ट्र स्वराज पक्षाचे अधिकृत उमेदवार मारुती साहेबराव भापकर यांनी आज किवळे-मामुर्डी विकास नगर परिसरात घरोघरी भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.
प्रहार जनशक्ती पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारतीय जवान किसान पार्टी (परिवर्तन महाशक्ती) यांच्या संयुक्त आघाडीचे उमेदवार असलेल्या भापकर यांनी या भेटीदरम्यान आपला कार्य अहवाल आणि गॅरंटी कार्ड मतदारांसमोर मांडले. नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रचार फेरीत ब्रह्मानंद जाधव, अजित पाटील, विक्रम पवार, शरद थोरात आणि नाना खरात यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. भापकर यांनी नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देत, आगामी निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०८:०५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: