चिंचवड - विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ संसदरत्न व खासदार डॉ. अमोल कोल्हे रविवारी भव्य बाईक रॅलीचे नेतृत्व करणार आहेत.
नवी सांगवीतील साई चौकातून सकाळी १० वाजता या रॅलीचा शुभारंभ होणार असून, रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप होईल. या रॅलीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
रॅलीचा मार्ग पाण्याची टाकी, बँक ऑफ महाराष्ट्र, शितोळे चौक गणपती मंदिर, बाळासाहेब शितोळे मार्केट, मेन रस्ता मंदिर, शिवाजी चेंबर्स, पवार नगर चौक गार्डन, अभिनव नगर, गजानन महाराज मुळा नगर यांसह अनेक प्रमुख मार्गांवरून जाणार आहे.
एकता आयप्पा मंदिर, पवना नगर, ममता नगर, सेवा हॉस्पिटल, जुनी सांगवी बस स्टॉप, ढोरे भवन, माकन हॉस्पिटल समोरून माहेश्वरी चौक, साई चौक, फेमस चौक, क्रांती चौक, कृष्ण चौक, काटेपुरम चौक मार्गे रॅली पुढे जाणार आहे.
रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, पूजा हॉस्पिटल, शिवाजी चौक, पी.सी.एम.सी बस स्टॉप, श्रुष्टी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महालक्ष्मी कार्यालय, जवळकर नगर, काशीद पार्क, स्वराज गार्डन चौक, काटे पेट्रोल पंप, काटे वस्ती, शिवार चौक, कोकणे चौक, पी.के चौक आणि महादेव मंदिर या मार्गांवरून प्रवास करत ही रॅली रहाटणीत संपन्न होणार आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०९:२१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: